महाबळेश्वरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी..

0

महाबळेश्वर प्रतिनिधी :

: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज महाबळेश्वरमध्ये शिवसेनेने विविध कार्यक्रम आयोजित केले. शिवसेना मा. जिल्हाप्रमुख राजेश (बंडू शेठ) कुंभारदरे आणि यशवंत घाडगे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना कुंभारदरे आणि घाडगे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा करत ठाकरे कुटुंबासोबत एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन शहरप्रमुख राजाभाऊ गुजर यांनी केले.

महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने आबा साहेब ढोबळे आणि कर्मचारी वर्गानेही बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व शिवसैनिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मा. मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमात महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे, तालुकाप्रमुख अभिषेक शिंदे, आरोग्य सेना तालुका समन्वयक शंकर ढेबे, मा. नगरसेवक, शहरप्रमुख सुनील नाना साळुंखे, युवसेना शहरधिकारी आकाश साळुंखे, मा. नगरसेवक रमेश शिंदे, पत्रकार बापू काळे, राजेश सोंडकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. सुजाता मोरे, महिला आघाडी उपशहरप्रमुख सौ. वसुधा बगाडे, सौ. पौर्णिमा मोहिते, एकनाथ मोरे, तात्या साळुंखे, आरोग्य सेना शहर समन्वयक अमोल साळुंखे, प्रशांत मोरे, बाळासाहेब ढेबे, अशोक ढेबे, अतुल पारवे, दीपक ताथवडेकर, वैभव शिंदे तापोळा, कामगार सेना युनिट प्रमुख अमर सरतापे, गणेश शिंगरे, प्रकाश ढेबे, संजय ढेबे, दत्तात्रय जाधव बोपेगाव, नयन वन्ने, शाहनवाझ खारकंडे, समीर तांबोळी, जावेद शेख, शशीकांत जाधव रामचंद्र आखाडे, रामदास आखाडे, कुरेशी, अभिजित कानडे, जितेश कुंभारदरे, यशवंत भिलारे, अंकुश उलालकर, सातारा जिल्हा प्रसिद्धी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पांचाळ आदी शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here