महाबळेश्वर तालुक्यात सर्वपक्षिय नेते,कार्यकर्त्यांच उत्साहात मतदान

0

महाबळेश्वर प्रतिनिधी : वाई विधानसभा मतदार संघासाठी महाबळेश्वर तालुक्यात उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणत शांततेत मतदान पार पडले महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्र‌वादी काँग्रेसच्या दोन्ही गटात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली शहरा प्रमाणेच ग्रामिण भागात देखिल मतदानाचा उत्साह पहावयास मिळाला राष्ट्र‌वादी कॉग्रेसचे उमेदवार आ मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथील काही मतदार क्रेदांना भेटी देवुन पाहणी केली या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे हे देखिल उपस्थित होते.

वाई खंडाळा व महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा हा मतदार संघ आहे. या मध्ये महाबळेश्वर  तालुका हा सर्वात लहान असून येथील मतदार संख्या देखिल वाई खंडाळा या दोन तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे परंतु तरीही या वेळी महाबळेश्वर तालुक्यातील मते ही निर्णायक ठरणार असल्याने या तालुक्यातील मतदानास वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे आज सकाळी उत्साहपुर्ण वातावरणात येथे मतदानास प्रारंभ झाला.

 सकाळी वेग कमी होता परंतु हळु हळु मतदानाचा वेग वाढला दुपार नंतर महाबळेश्वर शहर व ग्रामिण भागात मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते सकाळी ९ पर्यंत महाबळेश्वर येथे ५ टक्के मतदान झाले होते ११पर्यंत या मध्ये वाढ होवुन साधारण २१ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी १ पर्यंत ३४ टक्के तर तीन वाजे पर्यंत तब्बल ४६ टक्के मतदान पुर्ण झाले होते शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा महाबळेश्वर नगरपालिका केंद्र क्र.३६८ ते ३८६ या केंद्रातील झालेले मतदान हे पुरुष-३८०७,स्रीया-३६६४ असे एकुण ७४७१ इतके म्हणजे ५९.३४% मतदान झाले.

     निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात रस्सीखेच असल्याने शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात व ग्रामिण भागात देखील खेळीमेळीच्या वातावरणात शांततापुर्ण वातावरणात मतदान पार पडले .

 

दुपारी आ मकरंद पाटील यांनी महावळेश्वर येथील काही मतदान केंद्रांना भेटी देवुन पाहणी केली त्या वेळी कार्यकर्ते व मतदारांनी भेटुन आ पाटील यांना शुभेच्छा दिल्या या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर माजी नगराध्यक्ष किसनसेठ शिंदे उपनगराध्यक्ष अफजल सुतार सुनिल शिंदे दत्तत्रय वाडकर रोहीत ढेबे आदी मान्यवर उपस्थित होते याच वेळी इतर केंद्रावर देखिल उध्दव ठाकरे यांच्या गटाचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यशवंत घाडगे राजश्री भिसे महेश गुजर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते तर राष्ट्र‌वादी काँग्रेसचे विशाल तोष्णीवाल अॅड संजय जंगम संदीप साळुंखे ज्योती वागदरे शिंदे गटाच्या मेघा चोरगे आदी प्रमुख पदाधिकारी हे जास्तीत जास्त मतदान व्हावे या साठी प्रयत्न करताना दिसत होते.त्याच प्रमाणे मतदान प्रक्रीया सुरु असताना नोङल अधिकारी मिङीया योगेश पाटील,शिफ्ट नोङल अधिकारी आबा ढोबळे,झोनल अधिकारी अनुराधा पंङीत यांनी महाबळेश्वर येथिल मतदान केंद्रांना भेट देउन पाहणी केली.

   मतदान प्रक्रिया सुरू असताना आज येथील गिरिस्थान हायस्कुल मधील एका केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन मधून मतपत्रिका पडत नसल्याचे दिसुन येताच त्याची तातडीने दखल घेवुन ती चुक दुरूस्त करण्यात आल्याची माहीती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली एकंदरीत तालक्यात शांततापूर्ण व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडल्याचेही पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here