सातारा/अनिल वीर : देशातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक पर्यटक महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटनास येतात. संध्याकाळच्या काळामध्ये शेकोटी किंवा भट्टी याचा वापर राजगोसपणे करावा लागतो.आजही महाबळेश्वरमध्ये लाकूड व कोळसा व रॉकेल यावर काही लोकांना विसंबून राहवे लागते. दुर्गम भागामध्ये गॅस संपल्यानंतर शेगडीची व कोळशाची आवश्यकता असते.
तेव्हा रॉकेल व कोळसा पुरवठा करावा.अन्यथा,आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइंतर्फे देण्यात आला आहे.अशा आशयाचे निवेदन जिल्हा पूरवठाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.