महाबळेश्वर/प्रतापगङ:
256, वाई विधानसभा मतदारसंघातील महाबळेश्वर तालुक्यातील सर्व गावांमधील मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मतदान जनजागृती रॅलीचे चित्ररथाद्वारे आयोजन वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्याचे गट विकास अधिकारी यशवंत भांड, सहाय्यक गट विकास अधिकारी महादेव कांबळे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, तालुका आरोग्य अधिकारी प्रद्युम्न बुलाख यांचे उपस्थितीत करण्यात आले.
हा चित्ररथ महाबळेश्वर तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाणार असून त्याद्वारे मतदान प्रबोधनपर गीते, पथनाट्य, पोवाडे यांच्या माध्यमातून मतदारांना मतदान करणेकामी माहिती दिली जाणार आहे. तालुक्यातील सर्व मतदारांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 100% मतदान करावे, असे आवाहन गट विकास अधिकारी यशवंत भांड यांनी यानिमित्ताने तालुक्यातील सर्व मतदारांना केले आहे.
सदर चित्ररथाच्या आयोजनकामी श्रीगणेश शेंडे, विजय मोरे, अमित कारंडे, संतोष ढेबे, विष्णू ढेबे, शिवाजी पवार, अंकुश केळगणे, विठ्ठल सपकाळ, अभिजीत खामकर, सुहास कुलकर्णी, नामदेव धनावडे, प्रभाकर शेंडे, किसन दिवटे यांनी परिश्रम घेतले.