महामानवांच्या स्मारकप्रश्नी आगामी निवडणूकीत मतदानावर बहीष्कार घालावा !

0

सातारा/अनिल वीर : जिल्हा हा पुर्वीपासूनच पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतू त्या जिल्ह्यात पुरोगामी महामानवांच्या विचारांचा जागर करून सत्ता संपादन केली. त्याच जिल्ह्यात त्याच सत्ता भोगणारांनी आज प्रतिगाम्यांना कवटाळल्याचे दिसते आहे. त्याच जिल्ह्यात सेल्फी पाँइंटला जागा मिळते. पण महामानवांच्या पुतळ्यास व स्मारकास जागा मिळत नाही. किंवा तो प्रश्न सोडवताना कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येताना दिसत नाही. याचा विचार करून या सत्ता पिपासू लोकप्रतीनिधींच्या आगामी निवडणूकीत आंबेडकरवादी व पुरोगामी मतदारांनी बहीष्कार घालण्याचे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे 

     

 जिल्ह्यातील सातारा शहरात गेल्या १९८० च्या दशका पासून महामाता भिमाई स्मारकाचा प्रश्न तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारकाचा प्रश्न, कनिष्क मंगल कार्यालयामोरील बागेत राष्ट्रमाता सावीत्रीमाई फुले यांचा पुतळा बसवण्याचा ठराव नगरपरीषदेने केला असतानाही आज अखेर प्रश्न तसाच आहे. तसेच जिल्हा परीषद कार्यालयामोर फुले-शाहु-आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याचा एकमताने ठराव होऊनसुद्धा तोही प्रश्न तसाच पडून आहे. या बाबत जिल्ह्यातील एक ही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. ते तर सोडाच पण रयतेचे राजे छ.शिवाजी महाराज यांचे वारसदार कायम सत्तेत असतानासुद्धा बरेच पुरोगामी विचारवंत त्यांच्याच प्रेमात आहेत.तरीही प्रश्न सुटू शकले नाहीत. त्याचबरोबर जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले तरी हे प्रश्न तसेच आहेत. याचे उत्तर मागायचे कोणाला ? आणी कोण देणार ?  याचा प्रश्न लोकशाहीमध्ये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून सोडवण्याचा प्रयत्न मतदारांनी केला पाहीजे.

त्यासाठी एकतर प्रखर विरोध केला पाहीजे. नाहीतर आगामी निवडणुकीत मतदानावर बहीष्कार घातला तरच त्यांना जाग येऊ शकते. त्याचबरोबर ज्या ज्या पुरोगामी संघटना व आंबेडकरवादी पक्ष संघटनेचे जिल्हा नेते या प्रश्नावर ऐन निवडणूकीच्या तोंडावर आपापल्या नेत्यांना या स्मारकांच्या ठिकाणी भेटी देऊन या सत्ताधाऱ्यांना मदत करतात. काही वेळा निधीची घोषणा करतात. त्यांना सुद्धा फक्त प्रसिद्धीसाठी लोकांच्या भावनेच्या प्रश्नांनचा मुद्दा उठवायचा आणी स्थानीक लोकप्रतीनीधींचे फोटो लावून कार्यक्रम करायचे ! त्यांनाही जनतेने विचारले पाहीजे की, १९९५ पासून राज्यात आणी केंद्रात सत्तेत असतानाही प्रश्न का सोडवले नाहीत ? आत्ताच का या प्रश्नाची आठवण आली ? याचे उत्तर जनतेने निवडणूकीमध्ये सत्ताधीशांच्या प्रचारासाठी येणाऱ्या आंबेडकरवादी पक्ष संघटना तसेच पुरोगामी संघटना यांच्या जिल्हा व तालुका नेत्यांना पुरोगामी मतदारांनी ठणकावून विचारले पाहीजे.शिवाय, मतदानावर बहीष्कार घातला पाहीजे. त्याशिवाय या सत्ता पीपासू लोकप्रतिनिधींना व त्यांना घेऊन येणारे पुरोगाम्यांना व आंबेडकरवाद्यांना जाग येणार नाही. त्याशिवाय हे प्रश्नही सुटणार नाहीत. त्याकरीता सर्वांनी मतदानावर बहीष्कार घातला पाहीजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here