महायुतीच्या राजकीय सर्कसचे “रिंगमास्टर” उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ठरणार..

0

माळशिरस : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक वेळा राजकीय उलथापालक झालेली आहे त्यामुळे सत्तेत बदल झालेला आहे मात्र महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागलेले आहे पूर्वी भाजप व शिवसेना युती होती आता राष्ट्रवादीचा गट सत्तेत सामील झालेला आहे महायुतीच्या राजकीय सर्कसचे रिंग मास्टर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ठरणार आहेत महायुतीच्या राजकीय सर्कस मध्ये सरकारमधील व सरकार बाहेरील राजकीय पक्षांचे सिंह वाघ हत्ती कोल्हे लबाड लांडगे सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संपर्कात आलेले असल्याने राजकीय वर्तुळामध्ये सर्वसामान्य जनता व मतदार यांच्या मधून बोलले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्ट बोलणारा सडेतोड व विकासात्मक दृष्टी असणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जाते. अजितदादांनी राजकारण करीत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक नेते व कार्यकर्ते यांना राजकीय ताकद दिलेली असल्याने कोणत्याही पक्षात गेलेले असले तरीसुद्धा अजित दादा यांच्या संपर्कात अनेक नेते व कार्यकर्ते असतात पक्षातील व विरोधी पक्षातील नेते अजित दादा यांच्या भूमिकेकडे लक्ष देऊन असतात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला वेगळे वळण देणारे अजित दादा पवार यांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे खऱ्या अर्थाने राजकारणावर पकड असलेले अजितदादा पवार त्यांच्या संपर्कात सत्तेतील व सत्तेच्या बाहेरील नेतेमंडळी संपर्कात आलेली असल्याने खऱ्या अर्थाने महायुतीच्या राजकीय सर्कस मध्ये रिंग मास्टर अजित दादा पवार करतील असा सर्वसामान्य जनता व मतदार यांना विश्वास वाढलेला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here