सातारा/अनिल वीर : जी.के. गुजर मेमोरियल ट्रस्ट, डॉ.अशोक गुजर टेक्नीकल इन्स्टिट्यूटस,डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि डॉ अशोक गुजर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (बी. फार्मसी) यांच्या संयुक्त विद्यमाने, “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हसत खेळत विज्ञान आणि चमत्कारतून मनोरंजन” हा कार्यक्रम कराड येथे राबविण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास विध्यार्थी, विध्यार्थींनी,प्राचार्य , शिक्षक ,शिक्षीका, कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लूटला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मुल्ला व प्रकाश बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.भगवान रणदिवे (सातारा),शिवाजी बोत्रे (कराड), अजय कांबळे (कराड) व सौ.शितल कांबळे (कराड) यांनी सादरीकरण करून सर्वांना प्रफुल्लित केले.प्रश्नोत्तरे घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.