सातारा : भारतीय बौद्ध महासभेतर्फे महाविहार येथे कराड तालुकाध्यक्ष बी.जे.माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्तिकी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष गायकवाड गुरुजी, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन आढाव, तालुका कोषाध्यक्ष संजीवन लादे, तालुका संस्कार उपाध्यक्ष आर.बी.पाटणकर, तालुका कार्यालयीन सचिव मोहिते व तालुका संघटक नंदकुमार भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोडोली (सातारा) येथील ज्येष्ट कार्यकर्ते बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते वामन मस्के यांनी,साताऱ्यामध्ये बुद्ध विहार निर्मिती ते भिमाई स्मारक व बाबासाहेबांचा शालेय प्रवेश याबद्दल विश्लेषण केले.नंदकुमार भोळे यांनी गीतगायन करून आभार मानले.