महिलांनो चमत्काराला देवून नकार !  विवेकी दुर्गा  व्हा तय्यार !!

0

अनिल वीर सातारा : महिलांनी खरं तर चमत्कार नाकारून आधुनिक विवेकी दुर्गा बनण्यास तय्यार व्हायला हवे ! असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार यांनी केले.  भांडवली,ता.माण येथील सलग २५ वर्षे  सांस्कृतिक व प्रबोधनात्मक परंपरा जपणाऱ्या दुर्गामाता कला, क्रीडा व  सांस्कृतिक मंडळ,”शारदिय नवरात्र उत्सवात  विवेकी विचारांचा जागर करताना पोतदार मार्गदर्शन करीत होते.

             प्रशांत पोतदार म्हणाले, “स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन याचा खूप जवळचा संबंध आहे. देवीच्या अंगात येणे नेमके काय असते ? देवीचे अंगात आणून जळता कापूर खाणे, जळता पलीता अंगावरून फिरवणे, त्रिशूल जिभेतुन आरपार करणे इत्यादी चमत्कार दाखवून समाजात हितचिंतक अंधश्रद्धेस पोषक वातावरणाची पार्श्वभूमी तयार करीत असतात.म्हणूनच हे चमत्कार दाखवून यामागील उकल प्रात्यक्षिकांसह स्पष्ट करण्यात अंनिसचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात.” 

 

 समाजात देव आणि धर्म यांच्या नावाखाली काही भोंदू, बाबा, बुवा, मांत्रिक, स्वतःकडे असलेल्या दैवी शक्तीद्वारे चमत्कार करून दाखवतात. असे विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवून त्यामागील उकलही  हातचलाखी आणि विज्ञानही समजून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रारंभी प्रशांत पोतदार यांनी मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून उद्घाटन झालेचे जाहिर केले. तद्नंतर लंगर सोडवण्याचा चमत्कार दाखवून सर्वांना स्तंभित केले. चमत्काराची कारणमिमांसा स्पष्ट करण्यास मअंनिसचे राज्य कायदा विभाग सदस्य अॅड हौसेराव धुमाळ याना पाचारण केले. त्यानी “चमत्कार समजून घेवून यापेक्षा वेगळे चमत्कार दिसले तरी त्याची विज्ञानाद्वारे चिकित्सा करा. असे आवाहन केले. तसेच हातावरून जळता पलीता फिरवण्याच्या चमत्काराचे सादरीकरण केले. यावेळी काही धाडसी युवकांनी पुढे येवून आपले हातावरून जळता पलीता फिरवून घेवून थरार तर अनुभवलाच. पण, भाजत नाही याचा अनुभव घेतला. तसेच धुमाळ यांनी जिभेतून त्रिशूल आरपार करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे मध्यंतरात पुन्हा प्रशांत पोतदार यांनी उभ्या दोरीवर नारळाची कवटी फिरवणे, थाबवणे हा चमत्कार दाखवून लोकांना दिशाभूल म्हणजे काय असते? याचा प्रत्यय दिला. तसेच गंगेच्या कलशातून गंगाजल संपल्यावरही हवेतून कलश फिरवून पुन्हा गंगाजलचे वितरण उपस्थितांना केले.उत्तरार्धात दाखविलेल्या सर्व चमत्काराचे वैज्ञानिक स्पष्टीकरण सांगून लोकांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी दशरथ रणदिवे व युवा कार्यकर्ते मानस पोतदार यांनीही तांत्रिक बाजू सांभाळून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला दुर्गामाता कला,क्रिडा,सांस्कृतिक मंडळ भांडवलीचे – अमोल गोरख सुर्यवंशी,अमोल किसन सुर्यवंशी, प्रविण सुभाष सुर्यवंशी, प्रविण वसंत सुर्यवंशी, दत्तात्रय श्रीमंत सुर्यवंशी, प्रताप काशिनाथ सुर्यवंशी, दत्तात्रय वसंत बारसवडे, आदिनाथ प्रकाश सुर्यवंशी,दिनेश भिमराव सुर्यवंशी,सुधीर तुळशीराम सुर्यवंशी, संदिप गोरख सुर्यवंशी, विक्रम अतुल सुर्यवंशी, सुनिल विठ्ठल सुर्यवंशी, दिलीप तुकाराम सुर्यवंशी, देविदास शिवाजी सुर्यवंशी, भालनाथ नारायण सुर्यवंशी, विकास चंद्रकांत सुर्यवंशी, गणेश काशिनाथ गुरव, शशिकांत दौलत सुर्यवंशी, निळकंठ लालास गुरव इ. सभासद व त्यांचे कुटुंबीय, परिवारासह ग्रामस्थ, बाल-गोपाळ, अबालवृद्ध, महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवीदास सुर्यवंशी यांनी केले तर आभार दत्तात्रय बारसवडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here