महिला धम्ममित्र डे मोठ्या उत्साहात साजरा! 

0

सातारा/अनिल वीर : येथील त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्यावतीने महिला धम्ममित्र डे धम्मचारीनी अभयाज्योती (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

             प्रथम आदर्शाचे  पूजन धम्मचारींनी अभयाज्योती यांच्या हस्ते करण्यात आले.गाथापठन धम्ममित्र सीमा कांबळे आणि टीम यांनी केले.धम्ममित्र शोभा जाधव यांच्या हस्ते धम्मचारीनी अभयाज्योती यांचे स्वागत करण्यात आले. धम्ममित्र छाया साळवे यांनी अभयाज्योतींची ओळख करून दिली.धम्मचारीनी अभयाज्योती यांनी धम्ममित्रांसाठी ध्यानाचे महत्त्व विशद केले.

आनापानसती व मैत्रीभावना या ध्यानांचा प्रत्यक्ष सराव करून घेतला. आपण त्रिरत्नांप्रति शेवटच्या क्षणापर्यंत कटिबंध असलो पाहिजे. शरणगमनाविषयी त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरे व ध्यानामध्ये येणारे अडथळे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. धम्ममित्र सीमा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले. ध.ललिता गडांकुश यांनी सूत्रसंचालन केले.याकामी, धम्ममित्र प्रीती धस्के, दया जगताप, रेखा काकडे ,उज्वला मोरे, सीमा कांबळे ,छाया साळवे ,शोभा जाधव ,सुनीता कांबळे व ललिता गडांकुश यांनी अथक असे परिश्रम घेतले. शेवटची धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here