मांढरदेव परिसरात ग्रामपंचायतीमार्फत कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन

0
फोटो : कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन करताना तहसीलदार वैशाली जायगुडे शेजारी गटविकासाधिकारी नारायण घोलप, सरपंच सीमा मांढरे व इतर.(छाया-अनिल वीर)

मांढरदेव परिसरातील भाविकांनी प्लॅस्टिक कचरा कचरा संकलन केंद्रामध्येच जमा करावा : तहसीलदार वैशाली जायगुडे यांचे आवाहन

सातारा/अनिल वीर : मांढरदेव, ता.वाई येथील काळुबाई देवीची यात्रा गुरुवार दि.५  ते शनिवार दि.७ अखेर संपन्न होत असून यात्रा काळात मांढरदेव परिसरात ग्रामपंचायतीमार्फत ठिकठिकाणी कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.तेव्हा भाविकांनी प्लास्टिकचा कचरा इतरत्र न फेकता कचरा संकलन केंद्रांमध्येच जमा करावा. असे आवाहन नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांनी केले.  यावेळी पंचायत समितीचे गटविकासाधिकारी नारायण घोलप, सरपंच सीमा मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

   मांढरदेव येथील कचरा संकलन केंद्राचे नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते.दरवर्षी काळुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रसह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे पाच ते सात लाख इतकी असते. यात्रा कालावधीत येणारे भाविक जेवणाच्या पत्रावळ्या व इतर प्लास्टिकचे साहित्य  गडावर व इतरत्र अस्ताव्यस्तपणे फेकून देतात. त्यामुळे यात्रा संपन्न झाल्यानंतर सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने यावर्षीपासून कचरा संकलन केंद्रे १० ठिकाणी निर्माण केलेली आहेत. अगोदर पडलेला कचरा सदर कचरा संकलन केंद्रांमध्येच साठवलेला आहे. तो साठवलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे वाई येथील नगरपालिका कचरा डेपोमध्ये जमा करण्याची तरतूद केलेली आहे. तरी येणाऱ्या भाविकांनी प्लास्टिकचा कचरा कचरा संकलन केंद्रामध्ये जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. असे आवाहनही करण्यात आले आहे. कचरा संकलन उद्घाटनाच्या वेळी पाणीपुरवठा अभियंता म्हात्रे, कनिष्ठ अभियंता सागर कारंडे, विस्ताराधिकारी राहुल हजारे, रुपेश मोरे, उपसरपंच बापूराव  धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य विलास मांढरे, ग्यानबा ढेबे, काळूराम पार्टे, ललिता जाधव, आश्विनी ढेबे,  मंदा काशीद, शालन कोचळे, ग्रामसेवक शहाजी बोभाटे, ग्रामपंचायत कर्मचारी लहू मांढरे, सागर मांढरे, रामदास उंबरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here