माणमधील तरण्याताठ्या बैलाला बेंदराची भुरळ

0

बँडच्या गजरात अन् नर्तकींच्या नाचाने मुकी जनावरांसह उपस्थितांकडून बेंदूर उत्साहात 

गोंदवले   – माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील प्रवीण सुखदेव जाधव या शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या बैलाला तथा खोंडाला न्यू नॅशनल बँड अन् समोर नाचणाऱ्या नर्तकींमुळे अक्षरश: बेंदराची चांगलीच भुरळ पडलेली उपस्थितांनी अनुभवली.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी १९जुलै रोजी महाराष्ट्रीयन बेंदुर हा हिंदू धर्म संस्कृतीत अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणारा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दरम्यान शेतकरी वर्गाकडून आपल्या पाळीव जनावरांचे कौतुक होत असते. पाळीव जनावरांकडून होत असलेल्या मदतीमुळे कृतज्ञता भाव जपण्यासाठी हा बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याच अनुषंगाने माणमध्येही हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा झाला.

गोंदवले खुर्द येथील प्रवीण जाधव यांनी मात्र आपल्या वेगळ्या शैलीत आपल्या पाळीव जनावरांचे कौतुक करत त्यांची हौस मौज केली. सकाळी जनावरे धुवून त्यांना विविध रंगछटांनी सुशोभित करून बँड वाजवून नर्तकी नाचवून संपूर्ण गोंदवल्यात वाजत गाजत मिरवणूक काढली. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने गोंदवले खुर्द येथे साजऱ्या करण्यात आलेल्या बेंदराची मात्र माण तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

छाया – बैला समोर नृत्य सादर करताना नृत्यांगना.

                    – विजय ढालपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here