सातारा : “मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्यांचं पावित्र्य राखावं.अशी शिकवण मनूने दिली होती. त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं. मनूने जातीव्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीजं मनूने पेरली आहेत.” असं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या, ” फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम” या ग्रंथात लिहिलं आहे. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी दादासाहेब केंगार होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सरचिटणीस बी.एल.माने व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष माणिक आढाव यांनी दिनाचे महत्व विशद केले.सदरच्या कार्यक्रमास सुभाष सोनवणे, अंकुश धाइंजे,विश्वास सावंत, वामन गंगावणे आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.अनिल वीर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ऍड.विजयानंद कांबळे यांनी आपल्या मनोगतासह वात्सववादी काव्य गायले. पी.टी.(बापू) कांबळे यांनी मनोगतासह आभारप्रदर्शन केले.
“श्री.सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती नावाचा सनातन्यांचा ग्रंथ दहन करण्याचा ठराव मांडला होता. राजभोज यानी या ठरावाला आपला पाठिंबा दर्शविला. बहुमताने दहनाची ठराव संमत झाला.मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिषद मंडपाच्या पुढे एक खड्डा खोदण्यात आला. लोकानी मनुस्मृतीच्या काही प्रती गावातुन विकत आणल्या. कित्येकाना याची आधिच माहिती मिळाल्यामुळे प्रती सोबत आणलेल्या होत्या. शेवटी रात्री ९ वाजता मनुस्मृतीच्या प्रती खड्ड्यात टाकण्यात आल्या व एका बैराग्याच्या हाताने मनुला आग देण्यात आली. मनुस्मृतीला पेटविल्यावर जोरात घोषणा सुरु झाल्या. अख्या मंडमात जल्लोष होता. मनुचा अशा प्रकारे जाहीर दहन करुन अस्पृश्यानी आपण असले जातियवादी नियमाना भिक घालत नाही. समतेची कास धरली आहे याचा संदेश उभ्या भारताला दिला. खरं तर १९२६ मध्ये एक वर्षाआधी महाडजवळील एका गावात दि.२५ डिसेंबर १९२७ रोजी एक परिषद चालू होती. ती संपताना महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ‘जो धर्म आम्हाला माणूस म्हणत नाही, तो आम्ही का पाळावा ?’ उत्तरादाखल परिषदेत मनुस्मृती दहनाचा ठराव संमत करण्यात आला. त्याप्रमाणे प्रतीकात्मक पद्धतीने मनुस्मृतीची होळी केली. प्रतीकात्मक दहन म्हणजे केवळ एखादी प्रत जाळणे. मनुस्मृतीचे इतिहासातून बाबरी मशिदीप्रमाणे उच्चाटन नव्हे. कारण,नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.”