पुसेगांव प्रतिनिधी , पंकज कदम :
वडूज मार्केट कमिटी या सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते,पण तसे न होता विरोधकांनी ही निवडणूक लादली असे उद्गार खटाव – माण चे आमदार जयकुमार गोरे यांनी विखळे येथील ताई कंवेंशन हॉल मध्ये मार्केट कमिटी निवडणूक प्रचारार्थ खटाव तालुका विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ करकर्त्यांसमोर बोलताना काढले. या प्रसंगी मा.आ.प्रभाकर घार्गे, मा.आ.डॉ.दिलीपराव येळगावकर,संजीव साळुंखे, सचिन गुदगे, राम देशमुख,हणमंतराव देशमुख,मजनू मुलाणी, राजेंद्र लोखंडे,राजेंद्र कणसे, मारुती शेठ गारळे, पोपटरावं गारळे,अनिल घाडगे,डॉ.महेश गुरव,मोहनराव देशमुख,निलेश घार्गे,मोहन दगडे,महेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. आ.गोरे म्हणाले, अडचणीत असलेली मार्केट कमिटी आणखी आर्थिक अडचणीत येऊ शकते. असे सांगून ते म्हणाले ज्यांना तुम्ही विधान सभेला मदत केली ते तुमच्या विरोधात आहेत परंतु ज्यांना तुम्ही विरोध केला ते तुमच्या बरोबर आहेत.खटाव माण तालुक्याचा विकास करणे हे आपले कर्तव्य आहे,त्यासाठी मी सदैव मी आपल्या बरोबर आहे.खटाव तालुका विकास आघाडी चे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील. असे सांगून कलेढोण गणातील राहिलेल्या गावांना लवकरच टेंभू योजनेचे पाणी मिळेल अशी ग्वाही दिली.मार्केट कमिटीच्या निवडणुकीत कलेढोण गणातून २ मते का होईना जास्त देऊ,या संजीव साळुंखे यांच्या वक्तव्याचे कौतुक केले. मायणी येथील कॉलेज व हायस्कूल मधील काही शिक्षक हमाल मापाडी मतदार आहेत असे डॉ.येळगावकर यांनी निदर्शनास आणून दिले,त्यावर आमदार गोरे म्हणाले त्या शिक्षकांना शिपायचाच पगार दिला जाईल. व त्यांना शिपायचेच काम करावे लागेल. त्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवणार आहे . मा.आ.डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले,मार्केट कमिटीतील कर्मचाऱ्यांना १५ महिने झाले पगार नाही.त्यात पुन्हा ही निवडणूक,त्यामुळे संस्था जास्तच अडचणीत येईल.निवडणूक बिनविरोध होणे योग्य होते.केंद्राच्या योजना आणून या भागातील जनतेचा आ.गोरे यांनी फायदा करुन द्यावा. आपल्यातील दुरावा संपवू या.असे सांगून त्यांनी मायणी गणात ९५ ते९९ मते घेऊ असे ते म्हणाले.व्यापारी मतदार संघातील नवीन उमेदवार निवडून आणू,असेही ते म्हणाले. मा.आ.घार्गे म्हणाले,सहकारात वावरताना राजकीय जोडे बाहेर ठेवावे लागतात.आपण कुणाचाही द्वेष करत नाही.संजीव साळुंखे म्हणाले,सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत.असे सांगून मार्केट कमिटी मतदानात कलेढोन गण २ने का होईना पुढे असेल. कार्यक्रमास सर्व उमेदवार , मतदार व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.