मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात अन्याय ! वर्णेतील मुस्लिम समाजावर प्रशासनाचे निर्बंध !

0

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ने,ता.सातारा येथील ग्रामपंचायतीने अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना माईकवरून अजान बंदीचा ठराव विरोधार्थ निषेध करण्यात आला असून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ग) चे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, राज्य सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, मुस्लिम आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष सुरज मुलाणी, मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक जामदार,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे आदींच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे.मुख्यमंत्री यांच्याच जिल्ह्यात अन्याय होत आहे.दोन दिवसांत पालकमंत्री यांची प्रत्यक्षपणे भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. काही दिवसांपासून चालु असलेल्या आंदोलनाची धार वाढत असुन अनेकांनी भेटी देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे,रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष किरण बगाडे, रिपब्लिकन सेनेचे (प.) जिल्हाध्यक्ष विशाल भोसले,रमेश गायकवाड,किरण अडसूळे,महेंद्र सपकाळ,कृष्णात गव्हाळे,अमर गायकवाड आदी विविध संघटनाकडून पाठींबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल वीर,ऍड.विलास वहागावकर आदींनीही भेट देऊन कायद्याप्रमाणे शहर-ग्रामीण जे नियम असतील ते सर्व समाज घटकासाठी समानच असावेत. अशी मागणी करण्यात आली. आंदोलनस्थळी सकाळी ६ वा. फजरची नमाज,दुपारी १.३० वा.जोहरची नमाज,सायंकाळी ५ वा.असरची नमाज व रात्रौ ८ वा. ईशाची नमाज सुरू आहे.या संदर्भातही होणाऱ्या परिणामास / कायदा  – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील.तेव्हा ग्रामपंचायत बॉडी तात्काळ अपात्र करावी.सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर ठराव केल्याप्रकरणी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत.

ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला जातीय द्वेषापोटी भयभीत करण्याच्या हेतूने स्पीकर वरून अजान देण्यास बंदीच्या ठरावाप्रमाणे सअमपूर्ण गावातच स्पीकर बंदी लागू करावी.या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधितांना देण्यात आली आहेत.संबंधित पोलिसाबरोबर चर्चा करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी येऊन वाढता पाठींबा मिळत आहे.त्यामुळे लवकरात लवकर न्याय द्यावा.अन्यथा,तिव्रस्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.असाही गर्भित इशारा संजय गाडे यांनी दिला आहे.यावेळी युथ जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, सिद्धार्थ गायकवाड,समीर मुलाणी,सिकंदर शेख,अब्बास शेख, फारुख मुलाणी, पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here