वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणार !!
सातारा/अनिल वीर : मेडिकल कॉलेजच्या जागेतील लोखंड पत्रा, विट, लाकुड रॅबिटवर दरोड्याची व काळेश्वरी देवीच्या दानपेटीतील रकमेची व दागिन्यावर दरोडा टाकणाऱ्या आजी माजी ट्रस्टीच्या मालमत्तेची सीआयडी चौकशी करा.अन्यथा, सोमवार दि.२६ रोजी आमरण उपोषण रिपाईतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.
मेडिकल कॉलेजच्या जागेमध्ये जुन्या इमारती उतरवत असताना तेथील कोणत्याही इमारती उतरवण्याचे कसल्याही प्रकारचे टेंडर न करता तेथील लोखंड, लाकूड ,पत्रा, विटा, रॅबिट चोरणाऱ्यावरती गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन केली होती. परंतु, शासनास जाग येत नाही. त्यामुळे या संबंधित प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी.
कारण, यावर सार्वजनिक बांधकाम उप अभियंता भंपलवार भाष्य करण्यास तयार नाहीत. मेडिकल कॉलेजचे डिन चव्हाण मला यातील काहीच माहिती नाही. असे बोलतात तर धोम पाटबंधारे सिंचन विभागाचे पाटील हे सुद्धा कुठल्याही प्रकारचे भाष्य करत नाहीत. ते सांगतात की आम्ही २०१८ लाच इमारती आरोग्य मंत्रालयाच्या ताब्यात दिलेली आहे.तरी या प्रकरणांमध्ये काही अधिकारी यांच्यासह संबंधित कॉन्ट्रॅक्टर न्याती बिल्डरचे मुल्ला, बालाजी सिक्युरिटी समोर कोट्यावधी रुपयाचे साहित्य चोरून नेत असताना दहा जीसीपी,पाच पोकलॅण्ड,सात ट्रॅक्टर २५ डंपर व १०० लोक आठ दिवस ही चोरी राजरोसपणे करत होते. याबाबत रिपब्लिकन पक्षाने सातत्याने २ वेळा हे प्रशासनासमोर आणून देण्याकरता दोन वेळा आंदोलनेही केलेली आहेत.तरीसुद्धा यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.२६ रोजी अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
या संबंधित प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींचे जे बगलबच्चे आहेत. त्यांना वाचवण्याकरता प्रयत्न करीत आहेत.तेव्हा काही लोकप्रतिनिधी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.ते खोटा अपप्रचार करत आहेत.पाठिंबा देत असल्याचा बनाव करत आहेत. परंतु यामध्ये न्याती बिल्डरकडे कोणत्या प्रकारच्या मागण्या करून आपल्या बगलबच्चे यांना कामे दिली. याचं आत्मपरीक्षण लोकप्रतिनिधीने करावे. विनाकारण चोरांना पाठीशी घालून सुद्धा जनतेच्या मालमत्तेचा खोटा पुळका असल्याचे दाखवू नये.तसेच मांढरदेव,ता.वाई येथील काळेश्वरी देवीच्या दानपेटीतील रक्कमेची व दागिन्यावर दरोडा टाकणाऱ्या दोषी ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी. काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून आजीमाजी सर्व ट्रस्टींच्या मालमत्तेची सीआयडी चौकशी करावी.महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो भाविक आमावशा-पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार तसेच जानेवारी महिन्यातील पौष पौर्णिमेच्या दिवशी, यात्रा अशा दिवशी लाखो भाविक येतात.त्यामुळे अनेक प्रकारच्या देणग्या,रक्कमा आदी मिळत असते.त्यातच या काही लोकांनी अपरातफर केलेली आहे. त्याचीही चौकशी करावी. वेळप्रसंगी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयाचे दरवाजेसुद्धा ठोठावून संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व तो प्रयत्न करणार असल्याची माहिती युवकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांनी दिली.
ReplyReply allForward |