सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती खेड,ता. सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दीन दुबळ्यांना, दलितांना अन् स्त्रियांना शिकवून…. हे गीत डॉ. दिपक माने व सहकारी यांनी गाऊन अभिवादन केले. तद्नंतर पाण्याचा दिवा पेटवून ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते पेटवून भगवान रणदिवे (अंनिस कार्यकर्ते) यांनी चमत्कार सादर केला. नंतर लंगर सोडवून चमत्कार दाखवत सर्वांना अगदी सहज भाषेत विज्ञान सांगितले.
प्रा.विजय नलावडे यांनी सविस्तर मांडणी करत महात्मा फुलेची गाथा कथन केली. हवेतून चैन काढून आणि चमत्कारा मागील विज्ञान सांगितले.कार्यक्रम स्थळी पुस्तकाचा स्टॉल अंनिस चे विकास तोडकर यांनी मांडला होता.यावेळी अंनिस कार्यकर्ते डॉ. प्रदीप झनकर,दिलीप महादार, प्रकाश खटावकर,प्रा.दत्ता जाधव, विजय पवार आणि दत्ता कदम, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.