म.फुले यांना दिसले ते बाबासाहेबांनी अधिकचे केले : प्रा.निरंजन फरांदे

0

सातारा/अनिल वीर : म.फुले, म.बुद्ध व म.कबीर हे बाबासाहेबांचे गुरू होते.त्या सर्वांची विचाधारेचा पाया म.फुले यांनी रचला होता. विचारांचा स्पर्श व समतेचा विचार महापुरुषांनी दिला.असे प्रतिपादन प्रा.निरंजन फरांदे यांनी केले.

  येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ म.ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती साजरी करण्यात आली.तेव्हा प्रा.निरंजन फरांदे मार्गदर्शन करीत होते. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.प्रथमतः डॉ.आंबेडकर, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासह म.फुले यांच्या प्रतिमांना अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

   प्रा.निरंजन फरांदे म्हणाले, “आद्य क्रांतिकारक सुधारक म.फुलेंनी आधुनिक विचारधारेबरोबरच  समाजसुधारणेचा पाया घातला. नि, डॉ.आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने कळस चढविला आहे.म.फुले यांनी शेतीतील अनेक सुधारणा सुचवल्या होत्या.सत्यशोधक चळवळ म.फुले यांनी सुरू केली होती. त्यांनी सत्यधर्माची पुस्तिका लिहिली.कबीर पंथिय विचारधारा म.फुले यांच्यासह बाबासाहेब यांच्या वडीलापासूनची होती.  चार्वाक यांनी नास्तिकता शिकवला.त्याच धर्तीवर महावीर व बुद्ध यांनीही कार्य केलेले आहे.जगातील सर्व पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या होत्या. त्यांनी पारंपारिक व्यवस्थेत सुधारणा केली.  हिंदू कोड बिलावरून बाबासाहेबानी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आताचे राजकर्ते खुर्चीसाठी वाट्टेल त्या तडजोडी करीत आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here