सातारा : अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या सामाजिक चळवळी चालुच आहेत.मात्र, यशस्वी होण्यासाठी अधिकाधिक चळवळ गतिमान झाली पाहिजे. असे आवाहन लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले.
जकातवाडी,ता.सातारा येथील पंचशील निवासस्थानी वर्षावास व चंद्रकांत खंडाईत यांचा वाढदिवस संयुक्तिकरित्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा प्रमुख अतिथी लोकशाहीर संभाजी भगत मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभागीय उपाध्यक्ष भागवत भोसले होते.लोकशाहीर भगत म्हणाले,चंद्रकांत खंडाईत यांनी राजकीय पक्षातून चळवळ सुरू केलेल्या आहेत.त्यामुळे सामाजिक व धार्मिक बदल होताना आढळून येत आहेत.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ.गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन बी.एल.माने यांनी केले.तदनंतर भागवत भोसले व इतरांनी सार सांगुन मार्गदर्शन केले. अभिष्टचिंतनपर खंडाईत आप्पा यांचा लोकशाहीर संभाजी भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तदनंतर ज्येष्ट नेते दादासाहेब केंगार व सहकारी, भारतीय बौद्ध महासभेतर्फे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने, भागवत भोसले,नंदकुमार काळे व सहकारी,ऍड.हौसेराव धुमाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आप्पा यांचा सत्कार करण्यात आला.चंद्रकांत खंडाईत यांनी आभार मानले.यावेळी भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रमाने तर खऱ्या अर्थाने उंची वाढवली. शाहीर किरण जगताप यांनी अभिष्टचिंतनपर गीत गाऊन आप्पाचे गुणगान केले.त्यांनी इतरही गाणी गायिली.आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले लोकशाहिर संभाजी भगत यांनी पहाडी आवाजात गायन केल्याने श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाले.त्यांना कोरससह सर्वच उपस्थितांनी साथ दिली. सदरच्या कार्यक्रमास खंडाईत आप्पा यांच्या आईसह परिवार,ज्येष्ट कार्यकर्ते वामन गंगावणे, सुनील निकाळजे,समाधान वागमारे चंद्रकांत मस्के,मारुती भोसले, डी.एस.भोसले,तुकाराम गायकवाड,वसंत गंगावणे,वसंत खरात,मंगेश डावरे, मधुसूदन काळे,अनिल वीर,एन.डी.कांबळे,श्रीरंग वाघमारे,दिलीप सावंत,नवनाथ लोंढे,प्रकाश तासगावकर,खरात, वाघमारे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.