सातारा/अनिल वीर : नगर वाचनालयाचे माजी अध्यक्ष, स्व. सी. व्ही. दोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष सी.ए. अतुल जोशी यांनी डॉ. राजेंद्र माने यांच्या सल्ल्यानुसार रवींद्र बोडके यांच्या वेळे येथील ‘यशोधन ट्रस्ट’ला प्रत्यक्ष भेट देऊन मदत केली.
यावेळी डॉ.रवींद्र भारती झुटिंग,सी.ए.अतुल जोशी, डॉ. राजेंद्र माने यांनी निवारा केंद्राला भेट देऊन चर्चा-विनिमय केला. यशोधन ट्रस्टचे संजय बोडके यांनी आभार मानले.