माळशिरस : माळशिरस शहरातील युवा उद्योजक सचिनआप्पा शिवाजीराव वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 10/07/2023 रोजी समाज उपयोगी कार्यक्रम राबवून सामाजिक उपक्रमाने वाढदिवस सचिनआप्पा वावरे मित्र मंडळ यांच्या वतीने वाढदिवस संपन्न होणार आहे. सकाळी 09.30 वाजता रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून भव्य रक्तदान शिबिरास सुरुवात होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. समाजामधील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना 21हजार वही वाटप शालेय साहित्य स्कूल बॅग वाटप माळशिरस अकलूज रोड वरील 61 फाटा येथील निवासस्थानी भव्य दिव्य कार्यक्रमाचे जनसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन समाजामध्ये कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करून “जिथे विषय गंभीर तिथे सचिन आप्पा खंबीर” शालेय शिक्षणापेक्षा व्यवहार ज्ञानाने समाजात आपोआपच आप्पा झालेले आहेत आणि बघता बघता माळशिरस पंचक्रोशी मध्ये स्वकार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांचा वाढदिवस संपन्न होत आहे.
माळशिरसचे प्रगतशील बागायतदार शिवाजीराव वावरे व शामल वावरे यांच्या संस्कारातून सचिन व महेश यांची जडणघडण झालेली आहे. स्वर्गीय शिवाजीराव वावरे उर्फ दादा यांनी घालून दिलेला आदर्शाची शिदोरी घेऊन सचिन व महेश यांची समाजामध्ये वागणूक असते. श्रीमती शामल यांच्याकडे पितृत्व व मातृत्व दोन्हीही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत आहेत महेश आणि सचिन राम-लक्ष्मणासारखे दोघे एकमेकांमध्ये मिळून मिसळून सुखी संसार करीत आहेत सचिन यांना ताई व महेश यांना सारिका धर्मपत्नी आहेत दोघी जावा जावा आहेत परंतु बहिणी बहिणी सारखी घरामध्ये वागणूक असते दोन्हीही सुना सुसंस्कृत मिळालेल्या आहेत सचिन व ताई यांना ओंकार व समृद्धी अशी दोन अपत्य आहेत तर महेश व सारिका यांना संस्कृत व कार्तिक अशी दोन अपत्य आहेत.
स्वर्गीय दादांचे निधन झाल्यानंतर सचिन आप्पांवर प्रपंचाचा भार पडलेला आहे त्यांना महेश यांची मोलाची साथ मिळत आहे. माळशिरस शहरांमध्ये वाघमोडे, देशमुख, पाटील, टेळे, सिद, कोळेकर, काळे, वळकुंदे, सर्जे, जानकर, थोरात, अशी अनेक समाजातील नातेसंबंध असताना सुद्धा सचिनअप्पा यांनी इतर समाजामध्ये सुद्धा सलोख्याचे व मैत्रीचे संबंध जोपासलेले आहेत. सचिन आप्पा यांचा सुसंस्कृत व बोलका स्वभाव आहे त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये गगन भरारी घेतलेली आहे. शालेय शिक्षण पेक्षा व्यवहारांमधील शिक्षणामुळे सचिन आप्पा कोणत्याही व कसल्याही अडचणीच्या प्रसंगामध्ये तोडगा काढण्यामध्ये हातखंडा आहे प्रशासनातील अधिकारी व राजकारण समाजकारण यामधील लोकांशी आपुलकीचे व प्रेमाचे नाते निर्माण केलेली आहे. जिथे विषय गंभीर तिथं सचिन आप्पा खंबीर अशी समाजामध्ये ओळख झालेली आहे. माळशिरस शहरांमध्ये समाजकार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे नगरपंचायत निवडणुकीमध्ये सौ. ताई सचिन वावरे यांना बिनविरोध नगरसेविका बनण्याचा बहुमान मिळालेला आहे. प्रभागांमध्ये दोन-तीन वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला व मदतीला धावून जात असल्याने सर्वांनी सहकार्य केलेले आहे प्रभागातील लोकांच्या सहकार्यामुळे माळशिरस शहरातील दोन-तीन राजकीय असणारे गट यांनी सुद्धा सहकार्य करून माळशिरस च्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध होण्याचा बहुमान वावरे परिवार यांना मिळालेला आहे. सचिन आप्पा यांनी सामाजिक कार्यातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलेला आहे पाठीमागे त्यांनी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना वाड्यावर त्यावरून शाळेत येण्याकरता सायकली भेट दिलेल्या होत्या उद्याच्या वाढदिवसाला शालेय विद्यार्थ्यांना वह्या स्कूल बॅग रक्तदान शिबिर वृक्षारोपण असे समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांना बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनल च्या वतीने लाख लाख शुभेच्छा सचिन आप्पा आपणास उदंड आयुष्य आरोग्य धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस श्रीनिवास कदम पाटील परिवार यांचे कडून साकडे आहे.