रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मजूरासाठी धावले धैर्यशील पाटील

0

गोंदवले – १०८ला फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध  झाली नाही. पुसेसावळी येथील एक मजूर गोंदवले येथे कामानिमित्त आला होता. पावसामुळे तो रस्त्यावर घसरून पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. यादरम्यान संबंधिताला उपचारार्थ दाखल करण्या साठी १०८या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी खाजगी गाडी पाठवून देत संबंधित रुग्णाला दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही १०८ नंबरला कॉल करून देखील पहिल्यांदा दोन-तीन वेळा त्यांनी फोन उचलला नाही. फोन नंतर उचलला परंतु त्यावेळेस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आम्ही आचारसंहितेनंतर या बेजबाबदारपणाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी दत्ता बागल, तानाजी रणपिसे, ग्रामपंचायत सदस्य निलेश सोनवणे, विश्वराज कट्टे, लखन पारसे, नितीन देसाई, आदी ग्रामस्थ व मनसैनिक हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here