रणस्तंभ विजय दिनानिमित्त अभिवादन 

0

सातारा/अनिल वीर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ 206 वा भीमा-कोरेगाव शौर्य दिन अर्थात,रणस्तंभ विजय दिन मोठ्या साजरा करण्यात आला.  प्रथमतः स्तंभाच्या प्रतिकृतीसह पुतळ्यास पुष्पहार भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने, सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे सचिव बी.एल.माने, विश्वास सावन्त,द्राक्षा खंडकर,कल्पना भोसले आदींनी अभिवादन केले. 

                यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिल दल बजिल्हा उपाध्यक्ष दिलीप फणसे,रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, संघटक बबन करडे,अमर गायकवाड,शाहिर श्रीरंग रणदिवे, ऍड.विलास वहागावकर, गौरव भंडारे,नवनाथ लोंढे आदी मान्यवर उपस्थित अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले. आबासाहेब दणाने यांनी मनोगतासह आभारप्रदर्शन केले.

   पुणे जवळील भीमा-कोरेगावचा इतिहास सन- १८१८ साली ५०० शूर-वीरांनी गाजवला होता.तेथील  विजयस्तंभास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ सहकारी यांच्या सोबत प्रथम भेट दिली होती. तेव्हापासून राज्याच्या काना –  कोपऱ्यातुन भिमानुयायी दरवर्षीच वाढत्या संख्येनी अभिवादन करण्यासाठी जात असतात.कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायी यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सैनिकांच्या सन्मानार्थ विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्यासह इतरही लाखोंच्या संख्येनं भिम अनुयायिनी रात्री उशिरापर्यंत अभिवादन करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here