अनिल वीर सातारा : धम्मशील चॅरिटेबल ट्रस्ट, परिवर्तन मित्र समूह संस्था व लोकायत प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण जावलीकर लिखित,”रणात आहेत झुंजणारे अजुन काही…” या पुस्तकाचे प्रकाशन येथील संत गाडगे महाराज सांस्कृतीक भवन, कामाठीपुरा येथे विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके व रानभैरीकार गुलाब वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थान पद्मश्री माजी आमदार उपराकार लक्ष्मण माने यांनी भूषवले होते.
यावेळी प्रकाशक राकेश साळुंखे,बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते हरिदास जाधव आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. लेखक नारायण जावलीकर यांनी पुस्तकाबाबत माहिती कथन केली.विलासराव कांबळे यांनी प्रास्ताविक केले.अरुण जावळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास विविध संघटनांचे प्रतिनिधी,आंबेडकर चळवळीतील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.