रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने १५ ऑगस्टला आत्मदहन करणार : रमेश उबाळे

0

सातारा/अनिल वीर : पंढरपूर रस्त्याच्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे.त्याबाबत त्वरित सखोल चौकशी करून न्याय द्यावा.अन्यथा,दि.१५ ऑगष्ट ला आत्मदहन करणार असल्याचा इशारा रमेश उबाळे यांनी दिला आहे.

                  याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना उबाळे यांनी दिलेले आहे.भ्रष्टाचाराला शासकीय अधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात आहे.

पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून आहे. १०० टक्के निधी खर्ची न पडल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या भ्रष्टाचाराला शासकीय अधिकाऱ्यांकडून खतपाणी घातले जात असून  याविरुद्ध आम्ही उपोषण केले होते. परंतु आमची समजूत काढून उपोषण सोडविण्यास भाग पाडले होते. आपली शासनाने फसवणूक केली आहे  म्हणून याविरोधात थेट आपण दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी आत्मदहन करून आपला प्राण संपवणार आहे असा अंतिम इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिला असून ते म्हणतात, “सातारा-पंढरपूर रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असल्याचे निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु अतिरिक्त जिल्ह्याधिकारी यांनी लेखी पत्र देऊन सांगितले की, कंपनी तुम्ही व अभियंता सर्वजण मिळून रस्त्याची पाहणी करा.  व ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला असेल तो दाखवा. आणि ज्या ठिकाणी अपघात होत आहेत. ते ठिकाण ब्लॅकस्पॉट दाखवा. असे आम्हाला सांगण्यात आले. उपोषण त्यांनी मागे घ्यायला लावलं.तिथंच आमची फसवणूक झाली व त्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याने भेट घेतली नाही.पत्रव्यवहारही  केला नाही. म्हणून आता दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आत्मदहन करून आपला प्राण संपवून टाकणार आहे.”

                      या भ्रष्टाचारासाठी प्रशासनाकडून खतपाणी घातले जात आहे. असा आरोप करून  रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,”यामध्ये शासकीय अधिकारी, अभियंता व ठेकेदार या तिघांची मिलीभगत आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. एकंदरीत आम्हाला न्याय मिळणार नाही असेच दिसत असून चालू असलेले काम एम.एस.आर.डी.सी.चे अभियंता व ठेकेदार यांनी दखल घेतली नाही. वारंवार आम्ही या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आवाज उठवत असून आम्हाला आपल्याकडुन न्याय मिळाला नाही.म्हणुन थेट दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी आम्ही आत्मदहन करत आहोत. यात माझे काही बरेवाईट झाल्यास आपण सर्व अधिकारी जबाबदार रहाल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here