सोळशी / कोरेगाव तालुक्यातील राऊतवाडी गावचे सुपुत्र लेखक गीतकार व अॅक्टर रवी पुजारी यांची चित्रपट वेब सिरीज यामधून आता ते झळकणार मालिकेमधूनही. झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर व कलर्स मराठी वरील शेतकरीच नवरा हवा या मालिकेमधून रवी पुजारी यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. आपल्या अभिनयाचा ठसा ते उमटवत आहेत कलेचा कोणताही वारसा नसताना रवी पुजारी यांनी मालिका क्षेत्रातही आपली भरारी घेतली आहे त्याचबरोबर वाठार स्टेशन मध्ये सह्याद्री डान्स अकॅडमी व संगीत क्लासेस चालू केले आहेत परिसरातील मुलांना डान्स व संगीत शिकता यावे व योग्य तो प्लॅटफॉर्म मुलांना मिळावा या उद्देशाने सह्याद्री डान्स अकॅडमी चालू केली आहे संगीत क्लासेस मध्ये तबला हार्मोनियम मृदुंग याचे शिक्षण दिले जात आहे लवकरच अॅक्टींग क्लासेस ही चालू करण्याचा प्रयत्न आहे आपल्यातील सप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सह्याद्री डान्स अकॅडमी ला एकदा अवश्य भेट द्या रवी पुजारी यांच्या सह्याद्री डान्स अकॅडमी ला व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा