अनिल वीर सातारा : भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अश्वगतीने जात आहे.तेव्हा समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी राजकीय,धार्मिक,सामाजिक व शैक्षणिक संघटनांवर सकारात्मक चर्चा होणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन डॉ. ऍड.भीमराव आंबेडकर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ.ऍड. भीमराव आंबेडकर मुंबई येथील एका सभेला मार्गदर्शन करीत होते.
“शांत व संयमी नेतृत्व महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या संघर्षाची प्रत्येक क्षण अनुभवाला व त्याच मार्गाने डॉ.भीमराव आंबेडकर सर्व समाजातील माणसे जोडण्याचे काम अविरत करीत आहेत. हिच ऊर्जा आपल्या सर्वांना मिळत आहे. इतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक संघटना काम करीत आहेत.कार्यकर्त्यांची विचारपूस करीत आहेत. ताईसाहेब ते अगदी सुजातदादा, दर्शनाताई, अमनदादा या आंबेडकर परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या संघटनेतील व्यक्तीची आस्थेने काळजी घेत आहे. खरोखरच प्रेरणा स्रोत आहेत. म्हणून आज संस्थेचा कार्यभार वाढत आहे.” असे विचार पदाधिकारी यांनी व्यक्त केले.