राजे उमाजी नाईक यांची जयंती  सर्व शासकीय कार्यालयात साजरी होणार !

0

अनिल वीर सातारा : रामोशी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दादा बोडरे यांनी नुकत्याच 5 सप्टेंबर 2024 रोजी  जिल्हा कलेक्टर यांना निवेदनाद्वारे राजे उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबत निवेदन दिले होते.त्याची दखल घेत दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये उमाजी राजे नाईक यांची जयंती साजरी करण्याबाबत आदेश पारित केला आहे .

 

राजेंद्रदादा बोडरे यांच्या रामोशी ब्रिगेड संघटनेद्वारे रामोशी समाजाच्या विविध विषयांवर नेहमीच आवाज उठवला जात असतो. त्यातच रामोशी समाजाचे महापुरुष आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी होत नसल्याचे त्यांनी आपल्या संघटनेद्वारे जिल्हा कलेक्टर यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले होते. तसेच उमाजी राजे नाईकांची जयंती सर्व शासकीय कार्यालयामध्ये होण्यासंदर्भात मागणी केली होती. रामोशी ब्रिगेड या संघटनेच्या या मागणीला अवघ्या दोन दिवसात दखल घेऊन सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये उमाजी राजे नाईकांची जयंती साजरी करण्याबाबत आदेश पारित केले आहेत.याबद्धल बोडरे यांच्या रामोशी ब्रिगेड या संघटनेच्या या कृतीचे समाजातून कौतुक होत आहे.

कष्टकरी, कणखर व प्रामाणिक समजला जाणारा रामोशी समाज, आपल्या महापुरुषाच्या या कौतुक सोहळ्यामुळे नुकताच सुखावल्याचे चित्र अवघ्या सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. याशिवाय,वंचित बहुजन आघाडीचे नेते इम्तियाज नदाफ, ऍड. राजू भोसले, वडूजचे नगरसेवक तुषार तात्या बैले, प्रा.धनंजय ओंबासे,डॉ. सचिन साळुंखे, डॉ. प्रसाद ओंबासे, सत्यवान कमाने, महेश दादा करचे, बाळराजे विरकर, बीआरएस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादासो गोरड, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे वडूजचे मोहम्मद शरीफ आतार, फलटणचे हाजी निजामभाई आतार, आंधळी ग्रामपंचायत सदस्य अतुल खरात, मोगराळे उपसरपंच अमोल भोसले, अण्णासो मगर, धर्मराज जगदाळे, किरण कदम आदींनीही अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here