राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर !

0

डॉ.ओक दाम्पत्यांस आयुर अग्निविषयक पुरस्कार

सातारा/अनिल वीर : येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयतर्फे दिले जाणारे कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार – २०२३ चे जाहीर करण्यात आले आहेत.

             राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार रु. २,५००/-  व स्मृतीचिन्ह असे असणार असून कडेलूट – कादंबरी (लेखक-डॉ. श्रीकांत पाटील) व ‘काळ ‘ मेकर लाइव्ह – कादंबरी (लेखक बाळासाहेब लबडे).

   

राज्यस्तरीय अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार स्वरूप रु. १,०००/- रोख रक्कमेसह  स्मृतीचिन्ह दिले जाणार आहेत. त्यामध्ये वसप – कथासंग्रह (लेखक महादेव माने),प्रकाश पेरणी – कवितासंग्रह (कवी सुभाष कवडे),वसुंधरेचे शोधयात्री – संकीर्ण,(लेखक डॉ. अनुराग  लव्हेकर),कुणब्याची पोरं – कथासंग्रह (लेखक आप्पासाहेब खोत),भैरवायन – कादंबरी (लेखक नीलम माणगावे) व सवळा – कादंबरी (लेखक विठ्ठल खिलारी).याशिवाय, जिल्ह्यातील लेखकासाठी देण्यात येणारे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार स्वरूप रु. १,०००/- व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ – चरित्र (लेखक अमर शेंडे),दिडदा दिडदा – कवितासंग्रह (कवी डॉ.अदिती  काळमेख), उजळपरी – कादंबरी बाल वाङमय (लेखक सावित्री जगदाळे),सु -मनांचे रेखां – ‘कण ‘ –  कवितासंग्रह -(कवी रेखा विजय शिर्के) व गोष्टी लतादीदीच्या – बाल वांङमय (लेखक पद्माकर पाठक), डॉ. श्रीकांत कारखानीस अक्षर गौरव साहित्य गौरव पुरस्कार ( आरोग्य विषयक ग्रंथासाठी) पुरस्काराचे स्वरूप रु.१,०००/- रोख रक्कमेसह स्मृतीचिन्ह आयुर अग्नी – आरोग्यविषयक (लेखक डॉ.आनंद ओक/ डॉ. सुप्रिया ओक) यांना वितरण करण्यात येणार आहे.

       सदरचे पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते सातारा येथे संपन्न होणार आहेत.

अशी माहिती अश्वमेधचे संस्थापक डॉ.रविंद्र झुटींग भारती व अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here