सातारा/अनिल वीर : नुकत्याच पार पाडलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये भक्कम बाजू मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी पक्षाला रामराम ठोकुन पीपल्स रिपब्लिकन पक्षात डेरेदाखल झाले आहेत. आता वाहतूक संघटना व असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्याग करून ना.महेश शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे.राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला असताना जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातच घडलंय-बिघडय अशी गत झाली आहे.त्यामुळे पक्षाच्या वरीष्टांनी जमिनीवर येऊन विचार करण्याची वेळ आली आहे. असेही बोलले जात आहे.
राष्ट्रवादीमध्ये प्रचारानिमित्त तुतारी फुंकणारी नेतेगण पक्ष सोडून जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत चालले तरी काय? असा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांना भेडसावू लागलेला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलचराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे व वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पिसाळ यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे.कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ना.महेश शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे.आता त्यांनी तुतारी ऐवजी धनुष्यबाण हाती घेतलेले आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी. यासाठी काँग्रेस व इतर पक्षात काम करणाऱ्या अनेकांनी जेष्ठ नेते खा.शरदचंद्र पवारसाहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्ष वाढीसाठी प्रयत्नही केले. सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामीण भागातील सोसायटी ,ग्रामपंचायत व इतर निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला चितपट केले. अशा कार्यकर्त्यांना पक्षीय पातळीवर पद दिले असले तरी सत्तेमध्ये सामावून घेतले जात नव्हते. याची त्यांच्या मनात खंत कायम होती. परंतु, पक्षाचे ध्येय धोरण कधीतरी सामान्य माणसाच्या कामी येईल या आशेपोटी ते पक्षात थांबले होते.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्ष वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले ते पक्ष सोडून गेले पण सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत राहून नवीन चिन्ह खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी हाती तुतारी घेऊन फुंकत होते. त्यांच्या ऐवजी आलिशान वाहनातून फिरणारे व ठेकेदारीमध्ये माहीर असणाऱ्याच लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट मधील काही नेतेगण वागत होते. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात मते पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. या पराभवला जबाबदार असणारे आजही त्यांच्या सोबत आहेत. तर ज्यांनी निकाराची लढत दिली. त्यांच्यावर दूजाभाव होऊ लागला. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्या नंतर संजय पिसाळ, संतोष ननावरे यांनी सुद्धा पक्ष सोडला आहे. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांनी लढण्याऐवजी शस्त्र खाली ठेवून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. त्यांना सामावून घेऊन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे राजकीय अन्याय होणार नाही. यासाठी खबरदारी घेणार असल्याचे शिवसेना व पीपल्स रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी शब्द दिलेला आहे.बघुया, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून आणखी राजकीय घडामोडी घडू शकतात.