वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे :
सांगोल्यात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिमा रविवारी सायंकाळी जाळण्यात आली होती. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाद चांगला चिघळलेला दिसून येत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर माढा लोकसभा मतदारसंघात चांगलाच राजकीय वाद चिघळलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने निरा देवघरचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटू लागला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाठार स्टेशन येथील एका कार्यक्रमादरम्यान नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावर भाष्य केले होते याचाच रोष सांगोला तालुक्यात काल दिसून आला .
काल सांगोला तालुक्यातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिमा जाळून उग्र असे आंदोलन केले या आंदोलनामुळे पुन्हा एकदा नीरा देवघरचा पाणी प्रश्न पेटताना दिसून येत आहे तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये चांगलाच वाद चिघळलेला दिसून येत आहे याच्याच निषेधार्थ आज सकाळी श्रीमंत रामराजे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगोला जिल्ह्यातील या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी म्हणून वाठार स्टेशन पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक कदम, राष्ट्रवादीचे श्रीकांत चव्हाण व राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.