सातारा/अनिल वीर : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने येथील राष्ट्रभाषा भवनच्या मुख्य सभागृहात मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थान वैभव राजेघाटगे (सहसचिव, गृहविभाग, उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय,मुंबई) भूषवले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीपराव पवार उपस्थित होते. यावेळी प्रा. श्रीधर साळुंखे प्रमुख वक्ता मार्गदर्शन केले.यावेळी अश्विनी रविकांत सूर्यवंशी व विविध क्षेत्रातील मान्यवर व हिंदीप्रेमी,अध्यापक मंडळ व इतर सात सहयोगी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.सदरच्या कार्यक्रमामध्ये माजी प्राचार्य महाळाप्पा शिंदे, सुनील माने,अंकुश वाठारकर व अरविंद थोरात यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते सेवापूर्तीबद्धल सत्कार करण्यात आला.यामध्ये शाल, श्रीपळ,पुस्तके,संपूर्ण स्नेह वस्त्र, सन्मानपत्र आदीने हिंदी शिक्षक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांनी हिंदी अध्यापक मंडळ व अन्य सहयोगी संस्थाच्या कार्यात दीर्घ काळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर खटाव तालुक्यातील बुध गावचा सुपुत्र राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अभिषेक सूर्यवंशी व त्यांच्या माता-पित्यांचाही गौरवही करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापकपदी बढती मिळालेल्या हिंदी शिक्षकांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्तीसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.प्रथमतः गितमंचने स्वागतगीत सादर करण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.उज्वला मोरे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यवाह अनंत यादव यांनी आभार मानले.