विजय ढालपे,गोंदवले – नुकतेच दहिवडी येथे राष्ट्रीय अदालतीचे दहिवडी न्यायालयाचे वतीने यशस्वी आयोजन करण्यात आले. विधी सेवा समिती दहिवडी यांचे निर्देशानुसार दिवाणी व फौजदारी न्यायालय दहिवडी व विधी सेवा समिती दहिवडी यांचे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयाती चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणे वादपूर्व प्रकरणे अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती.
त्यापैकी दिवाणी कडील ७० व फौजदारी कडील १८ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली . सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे पॅनेल प्रमुख म्हणून एस.एस.गाडवे दिवाणी न्यायाधीश के.स्तर दहिवडी यांनी काम पाहिले. सदर राष्ट्रीय लोक अदालतीस विधीज्ञ तसेच पक्षकारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला व राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीरीत्या पाडण्यात आले.