सातारा/अनिल वीर : श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती व युवा सप्ताहानिमित्त येथील लालबहादूर शास्त्री कॉलेजच्या डॉ. बापूजी साळुंखे सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शाहीर श्रीरंग रणदिवे व सहकारी यांनी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत राष्ट्रीय युवादीन सप्ताहानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योति सावित्रीबाई यांना अभिवादन करण्यात आले.नव्या युगाची पहाट झाली विज्ञानाची कास धरू. या मित्रांनो या देशीत अंधकार दूर करू. तसेच छ. शिवाजी महाराज यांच्या गीतातून युवक – युवतीचे प्रबोधन करण्यात आले.बेटी बचाओ बेटी पढ़ाओ… या अंतर्गत मुलगी झाली तर तुला मी सांगतोय तिला कलेक्टर बनवूया…. अशा अनेक विषयांवर गीते व नाटक सादर करण्यात आली. शाहीरांना साथ-सुजीत गायकवाड, सागर सव्हाण, उर्मिला दिवे, संदीप सावंत, धम्मरक्षीत रणदिवे आदींनी दिली. प्राचार्य प्रा.डॉ.आर व्ही.शेजवळ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.सदरच्या कार्यक्रमास प्राध्यापक – प्राध्यापिका,कर्मचारी वृंद,विविध क्षेत्रातील मान्यवर व अध्ययनार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.