सातारा : महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.१६ रोजी दुपारी २ वा.येथील पाठक हॉलमध्ये वितरण करण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थापिका अध्यक्षा सौ.प्रतिभा सुनील शेलार यांनी दिली.
यामध्ये सर्वश्री अनिल वीर, अभिजित कुलकर्णी,अमर जाधव,सुवर्णा कचरे,सुधीर माने,मोहन जगताप, विकास तोडकर,किरण खरात, सौ. लिलाबाई जाधव,विकास तोडकर,संभाजी मदने,सुधीर माने,पद्मा गिरहे गिऱ्हे,शीतल मिसाळ,नासिर बागवान,अक्षय चव्हाण,समीर निकम,दीपक चव्हाण,सुनील भोसले,पांडुरंग माने,शोभा भोसले,शशिकला घाडगे,महेंद्र जाधव,शंकर माने, राहुल चव्हाण,सुरेश दयाळ, जगन्नाथ लोहार आदींचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.तेव्हा सम्बधितांनी वेळेवर उपस्थीत रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.