सातारा : महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्यावतीने बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती रविवार दि.१६ रोजी दुपारी २ वा.येथील पाठक हॉलमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थापिका-अध्यक्षा सौ.प्रतिभा सुनील शेलार यांनी दिली.
१९९१ साली अनिल वीर कॉलेजला असतानाच बंधुत्व प्रतिष्ठानची स्थापना करून अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस बंधुत्व पुरस्कार दरवर्षी देत आले आहेत.त्यामुळे आतापर्यंत ३७ इतकी संख्या झाली असून इतर ४१८ गुणिजनांनाही सन्मानीत केले आहे.त्यामुळे आतापर्यंत ४५५ इतकी संख्या झाली आहे. वीर सर यांनी कोणाची फाईल किंवा शिफारस मागितली नाही. शिवाय,त्यांनाही मिळालेले पुरस्कारांची पद्धतही तशीच आहे.पन्नाशी पार केल्याने ते मुळात समाधानी असून पुरस्कार मिळावेत म्हणून लालसाही नाही.पण,त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्य पाहता पुरस्कार स्वीकारण्याबाबत आदेशच दिला जातो.अर्थात,अनिल वीर कोणत्याही बाबतीत तडजोड करीत नाहीत.
अनिल वीर यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.त्यामध्ये स्थानिकपासून जिल्हा,राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले आहेत.समाजश्री, समाजरत्न, रयत, शिव-पंचगंगा गौरव,एकता, नेताजी सुभाषचंद्र बोस,एड्स नोडल टीचर, राज्यस्तरीय शिक्षकरत्न, समाजभूषण दोन वेळा, आनंदयात्री,प्राईड ऑफ मदर इंडिया, संगोष्टी-चर्चासत्र, राष्ट्रभाषा प्रचार-प्रसार, राष्ट्रनिर्माण, जीवनगौरव,आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार सलग १५ वर्षे, कोरोना काळात १० पुरस्काराबरोबरच महायोद्धा साताराभूषण पुरस्कारही मिळालेला होता. याशिवाय, अनुभव फिल्म क्लब,लुम्बिनी संघ,तांबडी माती, पत्रकार संघ,धगधगती मुंबई व सुयश सामाजिक शैक्षणिक संस्था आशा अनेक संघटनांकडूनही पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.