रास्त भाव दुकानांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

सातारा दि. 30 :  जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकाने मंजुर करण्याच्या अनुषंगाने दि.1 जुलै 2023 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करणेत येत आहे. यामध्ये, सातारा तालुका -ग्रामीण भागातील गावे- 13 व शहरी भागातील 03,  वाई तालुका- ग्रामीण भागातील गावे -१६ व शहरी भागातील 01 तसेच कराड तालुका ग्रामीण भागातील गावे – 01 व शहरी भाग – 04 याशिवाय, ग्रामीण भागाकरीता  माण तालुका 04,  महाबळेश्वर तालुका-45,  खंडाळा तालुका -09,  कोरेगाव तालुका -14,  खटाव तालुका-07,  फलटण तालुका – 05,  पाटण तालुका-09 अशा एकूण – 131 गावे / ठिकाणांचा समावेश आहे. याकरीता संबंधित तालुक्यांचे तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करणेचा कालावधी दि. 1 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 अखेर (सुट्टीचे दिवस सोडून) असा निश्चीत करणेत आला आहे. तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरिता ज्यांना अर्ज करणेचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. मुदती नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे आवाहन जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here