पुणे : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राहत असलेल्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले आहे.
तसेच सोसायटीमध्ये येणारे झोमॅटो स्विगी अमॅझॉन , फ्लिपकार्ट चे डिलिव्हरी बॉय यांची नोंद सोसायटीच्या रजिस्टरला करावी.
याशिवाय घरमालक आणि भाडेकरू यांच्यात भाडेकरार (लिव्ह अॅण्ड लायसन्स- झाल्यानंतर घरमालकांनी पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच मालमत्ता भाड्याने देणाऱ्या एजंट यांनी देखील भाडेकरुची माहिती दिलेल्या नमुना फॉर्ममध्ये भरून पोलीस ठाण्यात द्यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.