रिपब्लिकन पक्षाचा पुन्हा झंझावात निर्माण करा : जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड

0

सातारा-अनिल वीर : कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून पुन्हा नव्या उमेदीने पक्ष बांधणी करावी.पदाधिकारी यांनीही आपापल्या पदाप्रमाणे विशालदृष्टिकोणातून काम करावे. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांनी केले.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हावशी,ता.पाटण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली.तेव्हा अध्यक्षस्थानावरून  अशोकबापू गायकवाड मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”पाटण तालुक्याने आंबेडकरी चळवळीसाठी शहीद राम कांबळे यांचे बलीदान दिलेले आहे.सन – 1988 सालापासून चळवळ सुरू झाली.ही चळवळ तद्नंतर रिपब्लिकन पक्षात रुपांतरीत झाली.त्या काळापासून उभा केलेला झंझावात पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिवाचं रान करावे. कार्यकर्ते यांनी मतभेद विसरून एकत्रपणे कामाला लागावे.”

                पाटण तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करून तालुका व शहर कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यासाठी प्रभारी म्हणून संतोष जगताप,नितीन पिसाळ व दिपक भोळे तसेच महिला आघाडीसाठी श्रीमती साधना फुटाणे यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

         जिल्हा सरचिटणीस समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड म्हणाले,” पाटण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत.” पश्चिम महाराष्ट्र नेते प्रा. रविंद्र सोनावले यांनी पाटण तालुक्यात पक्षाचे क्रियाशील सभासद नोंदणी करताना सर्व विभागातील कार्यकर्त्यांनी सामाविष्ट करून नव्याने पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान पूर्वक काम करण्याची संधी दिली पाहिजे. अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्ह्यातून राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक मदने,वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे,खटाव तालुकाध्यक्ष कुणाल गडांकुश,कराड उत्तर अध्यक्ष उत्तम कांबळे,पक्षाचे नेते डॉ शिंदे,गणेश गायकवाड,अन्य मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याशिवाय,पाटण तालुक्यातील बळीराम गायकवाड, आनंदा कांबळे, नथुराम रोकडे, दिलीप जैन, दिपक काकडे, कैलास चव्हाण, सोपान कंठे, नंदकुमार देवकांत, कोकीसरे गावचे सरपंच रविंद्र बनसोडे, विलास आगाशे, पाटण शहरातून कौशक देवकांत, अरुण

देवकांत, दिपक देवकांत,सर्व तरुण कार्यकर्ते, महिला आघाडीच्या संगीता कांबळे, ज्योती गुजर, संगीता रोटे, विशाल काकडे,उमेश काकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पक्षाचे ज्येष्ट नेते तथा माजी तालुकाध्यक्ष  प्राणलाल माने यांनी आभारप्रदर्शन केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here