सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन पक्षाची पाटण तालुक्यातील सर्व क्रियाशील सभासद, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक रविवारी दि.२२ रोजी दुपारी १ वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक,म्हावशी येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदरच्या बैठकीत दि.३ रोजी सातारा येथे साजरा होणारा पक्षाचा वर्धापनदिन दिन कार्यक्रमाची पूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर आढावा
घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांनी विभागातील नियोजनाची माहिती घेऊन उपस्थित रहावे.यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा. रविंद्र सोनावले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.तेव्हा सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन तालुका प्रभारी अध्यक्ष संतोष जगताप यांनी केले आहे.