सातारा/अनिल वीर : नगर जिल्ह्यातील घटनेसह पालवन ता.माण येथील मागासवर्गीय महिलेला मारहाण करणाऱ्यांना फासावर लटकवा. अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली असुन तेथील शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या-त्या गावांना दौरे काढत आहोत. असेही राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी स्पष्ट केले आहे.
नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे काही समाजकंटकाने कोणतीही चूक नसताना दलित समाजातील चार मुलांना उचलून नेऊन बेदम मारहाण केली आहे. तसेच मारहाणीचे कारण म्हणजेच कबूतर व शेळी चोरीच्या संशयावरून त्यांच्या अंगावरती लघु शंका केली तसेच उघडे झाडाला उलटे टांगून मारहाण करण्यात आली आहे. तसेच थुंकी चाटायला लावली त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पालवन शहिदा महादेव तुपे महिलेस भर चौकात चार ते पाच जणांच्या जमावाकडून महिलेला उसाच्या दांडक्यांनी तसेच काट्यांनी – दांडक्यांनी बुक्क्यांनी भर चौकामध्ये अमानुष्यपणे मारहाण करून गावांमध्ये न राहू देण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत.तसेच समाजालाही तिथून पळून लावण्याचे गर्भित इशारा दिला आहे.अशा घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. तरी अशा अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करून त्यांना फासावर लटकावे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातत्याने मागासवर्गीयांवरती हल्ले, अत्याचार होत असतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गांभीर्यपूर्वक दखल प्रशासनाने घेतली जात नाही. त्यामुळे समाजकंटकाचे मनोधर्य वाढत आहे.त्यामुळे माणसाला माणूस न देता त्याला एक विशिष्ट जातीचे आहेत. म्हणूनच त्यांच्यावरती अमानुषरित्या छळ करणे. त्याच्यावरती लघु शंका करणे. तसेच थुंकी चाटायला लावले व उलटे टांगून मारणे. धिंड काढणे. असे प्रकार घडलेले आहेत. त्यामध्ये जनावरांना जशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे.तशा पद्धतीची माणसाला सुद्धा वागणूक देऊन उच्चवर्णीय आपल्या शक्तीचा धनाचा राजकीय ताकदीचे प्रदर्शन जातीवादी लोक करत आहेत. त्यामुळे अशा लोकांवरती शासन प्रशासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात यावी. भाजप व त्यांच्या मित्र पक्षाचे सरकार असल्यामुळे मागासवर्गीयांवरती अन्याय अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे धर्मांध-जातीवादी लोकांना येणाऱ्या काळात रिपब्लिकन जनता सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी खेरेगाव, ता. श्रीरामपूर, जिल्हा – अहमदनगर येथे पीडित कुटुंबीयांना भेट देण्याकरता जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अन्याय होईल. तिथे धडक कृती दल संबंधित अन्याय पिढी पिडीतांना जाऊन भेटणार आहोत. तरी संबंधित दलित व महिला अन्याय अत्याचाराच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष आक्रमकरीत्या आंदोलन भविष्यात छेडणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.