रिपाइं आणि रिपब्लिकन सेना जिल्हाधिकारी कार्यालय व वडूज पोलीस ठाण्यासमोर धरणे अंदोलन करणार

0

सातारा/अनिल वीर : गोंदावले (खु।।) येथील निष्पाप मयत सुरज सुनिल शिलवंत यांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या आरोपीवर  गुन्हा नोंद होऊन पंधरा दिवस झाले तरीही अजुन अटक झालेली नाही. त्या निषेधार्थ रिपाईतर्फे जिल्हाधिकारी घंटानाद आंदोलन केले जाणार असून रिपब्लिकन सेनेतर्फे शुक्रवार दि.१२ रोजी ११ वा पोलीस अधिकारी,वडूज येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

       

 सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असुन भा. द. वि. कलम ३०६, ३२३,५०४,५०६,३४ तसेच अनुसुचीत, प्रतिश्वंदक कायदा १९८९ कलम ३(२) (va), ६ अशा प्रकारे गुन्हा दाखल असुन सुद्धा अध्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत. आपल्या प्रशासनाकडुन गुन्हा घडुन पंधरा दिवस होऊन गेले तरी सदर आरोपीना अटक करण्यात आलेली नाही.तेव्हा सदर आरोपीना तत्काळ अटक करण्यात यावे.रिपाईतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर रिपब्लिकन सेनेतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी (खटाव माण) यांचे वडूज येथील कार्यालया समोर एक दिवशीय लाक्षणीक धरणे अंदोलन करणार आहे. आरोपींना तत्काळ अटक झाली नाही तर या पुढे आम्ही तीव्र स्वरुपाचे अंदोलन करणार आहोत. तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास आपले प्रशासन जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी.

सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी.अशी आग्रही मागणी मागणी करण्यात येत आहे.याबाबत पिडीत कुंटूंबाची भेट रिपाइं(ए)जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली घेतली.दरम्यान, रिपब्लिकन सेनेतर्फे सांत्वनपर घेतलेल्या भेटीप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हाध्यक्ष सुनिल कदम, रिपब्लीकन सेना युवा महासचिव  नितिन भोसले, खटाव तालुकाध्यक्ष अर्जुन भालेराव , जीवन तडाके, उत्तमराव मस्के, जयसिंग शेलार, गणेश थोरात, शांताराम भालेराव, सुहास जगताप,दादा खरात व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here