रूपाली जाधव यांना केले जटातून मुक्त !

0

\

अनिल वीर सातारा : कवठे,ता.खंडाळा येथील रुपाली जाधव यांना गेली एक वर्षापासून जट होती. त्यामुळे त्यांना मानसिक त्रासही होत होता.जट देवाची आहे. म्हणून त्या सहन करत होत्या. आजाराच्या उपचारासाठी येथील सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना डॉक्टर अजय देशमुख यांनी त्यांना जट काढण्याबद्दल सांगितले. कुटुंबीयांनी त्यांना मान्यता दिली व रूपाली ताईंना समजावले. प्रत्यक्ष जट काढायचे वेळी पुन्हा रूपाली ताईंचे मन देवाच्या भीतीने धास्तावले.

       

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बंधुत्व पुरस्कार विजेते उदय चव्हाण यांनी रुपाली जाधव यांना समजावले, “जट कापणाऱ्याला म्हणजे मला त्रास झाला तरी चालेल. पण तुमचा त्रास कमी व्हावा.यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.” या पूर्वी काही महिलांच्या जटा काढलेले फोटो त्यांना दाखवल्यानंतर त्यांची भीती थोडी कमी झाली. जट काढण्यास परवानगी दिली.

जट काढल्यानंतर त्या म्हणाले,”आता छान वाटतंय ! या कामी, हॉस्पिटलचे व्यवस्थापक रामदास शिंदे , वॉर्ड बॉय संदीप वाघमळे व सिस्टर निर्मला डांगे यांचे सहकार्य मिळाले.जट काढल्यानंतर रूपालीताईंची आई नंदा पाटणे व मुलगा कुणाल यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भगवान रणदिवे, अक्षय सपकाळ, नाना माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अजूनही समाजामध्ये महिलांमध्ये अशा जटा दिसून येतात.ज्यांना जट आहे. पण, काढण्याची भीती वाटते. त्यांनी समितीशी संपर्क साधावा. असेही आवाहन उदय चव्हाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here