दिनदर्शिकेचे मान्यवरांचा हस्ते प्रकाशन
अनिल वीर सातारा : आई-वडिल मुलांवर संस्कार करतात. तर ज्ञानदानासह मुलांमध्ये आचार, विचार आणि नीती मूल्ये रूजवण्याचे काम शिक्षक करतात. यातून देशाचे भावी सुजाण नागरिक घडवण्याचे काम शिक्षकांच्या हातून होत असल्याने शिक्षकचं खर्या अर्थाने राष्ट्र निर्माता आहेत. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ कराडने शिक्षकांचा ’राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने केलेला सन्मान सार्थ असल्याचे मत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कराडच्या पुरस्कार वितरण व 2025 च्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल हुद्देदार होते. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सेक्रेटरी आनंदा थोरात, लिटरसी डायरेक्टर शिवराज माने, प्रोजेक्ट चेअरमन शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरच्या कार्यक्रमात शिक्षिका सौ.उर्मिला शिवाजी पाटील, सौ. निलम प्रदिपकुमार पाटील, सौ. विद्या दिलीप चव्हाण, शिक्षक रमेश पांडुरंग पवार व सचिन प्रकाश शेवाळे यांना मान्यवरांच्या हस्ते ’राष्ट्र निर्माता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रोटरी क्लब कराडच्या सन 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. फोर वे टेस्ट वाचन बद्रिनाथ धस्के यांनी केले. वाढदिवस व पत्रव्यवहार वाचन सेक्रेटरी आनंदा थोरात यांनी केले.पुरस्कार प्राप्त शिक्षकांची ओळख शुभांगी पाटील, गजानन कुसुरकर, दिलीप पाटणकर, विशाल घुटुकडे व प्रवीणकुमार शिंदे यांनी करून दिली. डॉ.अनिल हुद्देदार, सौ.उर्मिला पाटील व रमेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
क्लब अध्यक्ष रामचंद्र लाखोले यांनी स्वागत केले. लिटरसी डायरेक्टर शिवराज माने यांनी प्रास्ताविक केले. राजगोंडा अपीने यांनी सुत्रसंचालन केले. आनंदा थोरात यांनी आभार मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.सदरच्या कार्यक्रमास किरण जाधव, जगदीश वाघ, जयंत जगताप, रघुनाथ डुबल, डॉ.मनोज जोशी, शुभांगी पाटील, विकास देसाई, डॉ.गजेंद्र पवार, अभिजित गोडसे, प्रवीणकुमार शिंदे, दिलीप हपाटणकर, विशाल घुटुकडे, गजानन कुसुरकर, राजगोंडा अपीने, कुमारी हर्षला देशमुख व श्रीमती रेखा आदींची उपस्थिती होती.