सातारा : “जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी” हे ब्रीदवाक्य आपल्या मनामध्ये बाळगून अखंड आयुष्य देशसेवेसाठी अर्पण करणारे क्रांतीपिता, भारतीय स्वातंत्र लढ्यात अनेक बलाढ्य क्रांतिवीर घडवणारे गुरुवर्य,थोरसमाज सुधारक, सशस्त्र क्रांतीचे जनक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती विविध संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उमेश चव्हाण,अनिल वीर आदी विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थीत होते.