लायन्स क्लबचा पद्ग्रहन समारंभ मोठ्या उत्साहात

0

सातारा/अनिल वीर :लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाळ सातारा क्लबचा पदग्रहण समारंभ दिपलक्ष्मी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

         यावेळी लेखक व व्याख्याते प्राचार्य डॉ. विजयकुमार नलवडे यांचे श्री.छ.संभाजी पुत्र शाहू महाराज यांच्याविषयी व्याख्यान झाले. सन 2023-24 च्या संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ एम.जे.एफ डिस्ट्रिक्ट चेअरमन पी.आर.ओ 3234 डि-1 ला.धैर्यशील भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लेखक-व्याख्याते प्राचार्य  डॉ.विजयकुमार नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुणे शहर प्रतिनिधी  म.सा.प.पुणे ला.शिरीष चिटणीस, रिजन चेअरमन रिजन-2 डि 3234 डि-1, ला.बाळासाहेब शिरकांडे,झोन चेअरमन झोन-1 डि 3234 डि-1 ला. बाळासाहेब महामुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. क्लबच्या नूतन अध्यक्षपदी ला. आग्नेेश शिंदे,सचिवपदी ला. अभिनंदन मोरे आणि खजिनदार म्हणून ला. विनायक भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर क्लबचे प्रथम अध्यक्ष

 ला. जयेंद्र जाधव,क्लबचे संस्थापक- संचालक ला.शिरीष चिटणीस, संचालक ला. शशिकांत शेलार, ला.शिरीष कदम, मेंबरशिप चेअरमन ला. रमेश इंदलकर, एल.सी.आय. एफ. कोऑर्डीनेटर ला.राजेश चिटणीस, टेल ट्विस्टर ला.सुनील मोरे, टेमर ला. प्रशांत देशमुख आदींनी आपल्या पदाची शपथ घेतली.लायन्स क्लब ऑफ सातारा  गेंडामाळ या क्लबमध्ये प्रशांत कुलकर्णी यांनी विश्वनाथ जरे, आग्नेेश शिंदे,जयेंद्र जाधव, कौशिक कुलकर्णी, सौदागर, अभिषेक कुलकर्णी आदी नूतन सभासद झाले.ला.आग्नेेश शिंदे व त्यांचे सर्व संचालक मंडळ सन 2023-24 या वर्षात क्लबच्या सर्व समावेशक कामाच्या माध्यमातून आपले विशिष्ट स्थान निर्माण करतील. सदरचा क्लब इंटरनॅशनलच्या व्यासपीठावर  एक उंची गाठेल. तसेच सदरचा क्लब हा 3234 डि-1 यामध्ये  आपले नाव अधोरेखित करेल. तसेच क्लबच्या नावलौकिकात भर घालेल.अशी सदिच्छा ला. राजेश चिटणीस यांनी व्यक्त केली.ला.ला.प्रशांत यांनी परिचय करून दिला.ला.विनायक भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here