सातारा/अनिल वीर : समाजप्रबोधनाचे काम लोककलावंत करीत आहे. खरोखरच,सांस्कृतिक सेलचे कार्य आदर्शवत आहे.असे गौरवोद्गार काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी काढले.
टाकेवाडी, ता.माण येथील सांस्कृतिक क्षेत्रात शाहीर महावीर शिंदे यांनी आजवर कलावंत म्हणून दिलेले योगदान अतुलनीय असल्यामुळे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने काँग्रेस कमिटीच्या लोककलावंत सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तेव्हा पटोले यांनी विचार सांगतल्याचे संयोजकांनी सांगितले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा लोककलावंत सांस्कृतिक सेल अनेक वर्षा पासून सर्व समाज घटकातील कलावंतांच्या उत्थानाचे कार्य करीत आहे. समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती नष्ट करण्यासाठी मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना प्रदेश काँग्रेस तर्फे नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. योग्य कलागुण अवगत असून सुद्धा प्रसिद्धीपासून वंचित असलेल्या कलावंतांना सेलतर्फे विचार मंच उपलब्ध करून दिला जातो. लोककलावंत सांस्कृतिक सेलचे सर्व कार्यक्रम कोरोना महामारीमूळे दोन वर्षे थांबले होते. सेलने पुन्हां नव्या उमेदीने कार्यारंभ करण्याचे ठरून नुकताच रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी दादर, मुंबई येथे भव्य असा लोककला मोहोत्सव आयोजित केला होता.या कार्यक्रममध्ये विविध कालावंतांकडून विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले होते. कलेद्वारे समतावादी विचारांचा प्रचार – प्रसार करून विविध कलागुण अवगत असलेल्या सर्व समाज घटकातील लोककलावंतांचे प्रश्न सोडविणे साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ.माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडोरे व ख्यातनाम गीतकार-गायक विष्णू शिंदे,कवी बडोरदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणमहर्षी डॉ.जी. के.डोंगरगावकर यांच्या हस्ते शाहीर महावीर शिंदे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. निवडीबद्दल शाहीर महावीर शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.