सातारा : बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही परिपक्व अशी दिली आहे.मात्र,शाख्य संघापासूनच मूळ संकल्पना लोकशाहीची आहे.असे विचार ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते विलासराव कांबळे यांनी व्यक्त केले.
करंजे (सातारा) येथे कालकथित श्री. व सौ.शाहिर माधव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्षावास कार्यक्रम सम्यक ज्येष्ट नागरिक संघातर्फे आयोजित करण्यात आला होता.तेव्हा कांबळे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी अध्यक्ष शामराव बनसोडे होते.प्रथमतः महापुरुष यांच्या मूर्तींना व भोसले यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी व भोसले परिवाराने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी पुष्पांजली व मेणबत्ती प्रज्वलीत केली.दरम्यान, बाळासाहेब सावंत यांच्या निवासस्थानी वर्षावास मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉ.आंबेडकर यांनी लिहिलेल्या, “भ.गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन करून त्यावर भाष्य अनेकांनी केले. सचिव बी.एल.माने यांनी प्रास्ताविक केले.शांतीलाल भोसले यांनी आभार मानले. शाहिर किरण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भिम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम पार पडला.सदरच्या कार्यक्रमास शाहिर श्रीरंग भोसले, सत्यवान गायकवाड, चंद्रकांत मस्के, पी.डी. साबळे,मारुती भोसले,चंद्रकांत खंडाईत, आत्माराम घोडके, सुखदेव घोडके,अनिल वीर,महादेव मोरे,मस्के,जाधव,संतोष मोरे, अशोक बनसोडे, दिलोप सावंत, अंकुश धाइंजे, संपूर्ण भोसले व नातेवाईक परिवार उपस्थित होते.