लोकशाही टिकविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावा : ता.का.सूर्यवंशी

0

सातारा : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने ८ संस्थाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात.ग्रंथ भांडार, पतसंस्था,सामाजिक व शैक्षणिक निरंतर उपक्रम चालवले जातात. त्याचा लाभ घ्यावा. जेणेकरून लोकशाहीस बळकटी येण्यासाठी प्रयत्न होत असतो. अर्थात, लोकशाही टिकली पाहिजे.असे प्रतिपादन हिंदीभूषण ता.का. सुर्यवंशी यांनी केले.

     येथील राष्ट्रभाषाभवनच्या प्रांगणात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संभाजीनगरचे ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष मोहनराव पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.तेव्हा समारोपप्रसंगी सभागृहात झालेल्या सहविचार सभेत अध्यक्षस्थानावरून ता.का. सूर्यवंशी मार्गदर्शन करीत होते.ते म्हणाले,”देशाची अखंडता व एकात्मता राखण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील असले पाहिजे.”वास्तव परिस्थिती व संविधान या विषयांवर सविस्तर विश्लेषणही सूर्यवंशी यांनी विविध उदाहणाद्वारे केले.पोळ यांनीही प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले.

                  सदरच्या कार्यक्रमास सहकार्यवाह सुनंदा शिवदास, परिक्षामंत्री शिवाजीराव खामकर, भवनचे सचिव श्रीकांत लावंड, नारायण शिंदे,चंद्रकांत मस्के, मारुती शिवदास,अनिल वीर, नामदेव तरडे,ग्रामपंचायतीचे सदस्य सुजित चावरे,अंकुश साळुंखे,बाळासाहेब पवार,विजय जगताप,पी.ए. पाटील,रमेश माने,प्रवीण पालकर,विमल तरडे,अर्चना कुंभार,आशा जगताप,जयश्री शिंदे,रंजना काटवटे,चित्रा काटवटे,के.आर. चावरे, दिनेश माने,अक्षय देसाई, चंद्रकांत संकपाळ,रवींद्र महाजन, अशोक शिंदे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. संजय काटवटे यांनी सूत्रसंचालन केले. शाहनवाज मुजावर यांनी आभारप्रदर्शन केले.याकामी, राष्ट्र भाषानुरागी पतसंस्थेचे व्यवस्थापक नवनाथ शिंदे,मंगेश पवार,धोंडिबा खरात,कोंडीराम झोरे,धनश्री लोहार,शुभम साळुंखे आदींनी अथकसे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here