सातारा : संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरणाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड तफावत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या जातींचे सर्वसमावेशक संशोधन करून लाभापासून अतिवंचित घटकांची नोंद करावी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरण ठरवावे. अशी शिफारस केली आहे. याशिवाय,नव्याने जातीनिहाय नोंदणी केली तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. असा सूर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंदनेनिमित्त सहविचार सभा संपन्न झाली.तेव्हा रमेश इंजे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.तेव्हा उपस्थीत कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने २५ मार्च २०२३ ला मुंबई येथे ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या समाजाच्या उन्नतीसाठी ‘बार्टी’च्या अंतर्गत अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने अनुसूचित जातींतील लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास, सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणे आणि काही राज्यात लागू असलेल्या उपवर्गीकरणाची तपासणी करून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार १९६१ पासून ते २०११ पर्यंतच्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला.२०११च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट ५९ जातींमध्ये बौद्ध जातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के, मातंग जातीची १९ टक्के,चर्मकार जातीची १०.९ टक्के तर वाल्मीकी मेहतर समाजाची ३.२ टक्के आहे.मेहतर,ढोर,मायवंशी, होलार यांची १.८ टक्के, १.६ टक्के, १.१ टक्के आहे. ०.९ टक्के ते ०.१ टक्के दरम्यान होलार, खाटिक, मदागी, बुरुड, मेगवाल, गारुडी, बेडा जंगम, पासी, बलाही, मादिगा, माला, जातीची लोकसंख्या दिसून येते.
०.०६ ते ०.०००१ टक्क्यांमध्ये उर्वरित ३९ जातींचा समावेश आहे. यावरून अनुसूचित जातीच्या ५९ जातींच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड तफावत दिसून येत असल्याचे निरक्षण समितीने नोंदवले आहे. त्यामुळे सर्व जातींचे सर्वसमावेश असे संशोधन करावे व लाभापासून वंचित घटकांची नोंद करून धोरण ठरवणे आवश्यक आहे. असे अहवालात नमूद आहे.
प्रारंभी,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद बनसोडे (रिपब्लिकन सेना) व मदन खंकाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए) तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भन्ते दिंपकर यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडला.यावेळी निवृत्ती रोकडे,प्रा. दादासाहेब गायकवाड,अनिल वीर,शाहिर श्रीरंग रणदिवे,प्रशांत झालटे, दयानंद बनसोडे,ऍड. विलास वहागावकर,माजी पीएसआय मोरे (नूने) व त्यांचा परिवार, माजी प्राचार्य रमेश जाधव, डॉ.आदिनाथ माळगे, विलास कांबळे,संजय नितनवरे, प्राचार्य शिर्के,तुकाराम गायकवाड, मुरलीधर खरात, शामराव बनसोडे, बी.एल. माने,वसंत गंगावणे,भाऊ धाइंजे आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.